इचलकरंजीत ‘प्रगंध गेस्ट हाऊस व स्टुडंट्स स्टडी रूम’ची सुरुवात
इचलकरंजी :
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘प्रगंध गेस्ट हाऊस व स्टुडंट्स स्टडी रूम’ या उपक्रमाची सुरुवात सुतार परिवाराच्या वतीने करण्यात आली. अण्णा रामगोंडा शाळेमागे असलेल्या अॅड. माधुरी काजवे यांच्या इमारतीत गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.१० वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, नगरसेवक ओंकार सुर्वे तसेच दीपक रावळ व प्रशांत सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शांत व अभ्यासपूरक वातावरण मिळावे, तसेच बाहेरगावीून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास अॅड. सौ. माधुरी काजवे, श्रीकांत काजवे, आतिष शिंदे सर, वसंत कोरवी यांच्यासह पत्रकार अभिजीत पटवा, अतुल पाटील, माधुरी शेडबाळे, जयश्री पाटील, वंदना खामकर, नम्रता पसारे, मेघा घोटकिंडे, जावेद मुल्ला, शिवाजी माने, सुहास खामकर, नितीन ठिगळे, श्रीकांत सोनटक्के, स्वप्निल शेडबाळे तसेच सुतार परिवार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्यसैनिक मा. मालुताई सुबराव सुतार, प्रकाश सुबराव सुतार व सौ. कस्तुरी प्रकाश सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






