ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; अज्ञात दोघांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; अज्ञात दोघांवर गुन्हा

इचलकरंजी :
श्रीपादनगर परिसरात सकाळी योगा क्लासहून परतणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. जयश्री आबासाहेब घाटगे (वय ७०, रा. वृंदावन अपार्टमेंट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्या असताना दोन इसमांनी अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ४५ हजार किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावले. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून पसार झाले.
या प्रकरणी इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी मृणालिनी पाटील करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा