ICHMH51NEWS.IN
9921600800

दिग्विजय नाईक फाउंडेशनच्या राजरत्न कांबळे यांची बॉम्बे इंजिनीयर ग्रुपमध्ये निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिग्विजय नाईक फाउंडेशनच्या राजरत्न कांबळे यांची बॉम्बे इंजिनीयर ग्रुपमध्ये निवड

इचलकरंजी :
शहरातील युवा हॉकीपटू राजरत्न कांबळे यांची भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित बॉम्बे इंजिनीयर ग्रुप (BEG) मध्ये हॉकीच्या स्पोर्ट्स कोट्यातून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजरत्न कांबळे यांनी क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले. उत्कृष्ट खेळासोबतच फिटनेस, मानसिक तयारी आणि संघभावना यांनाही त्यांनी विशेष महत्त्व दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत भारतीय सैन्यातील प्रतिष्ठित बॉम्बे इंजिनीयर ग्रुपमध्ये त्यांची निवड करण्यात आली.
या यशामागे दिग्विजय नाईक फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच दिग्विजय नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सुहास पाटील, संजय पोवाडे, प्रवीण देशमुख, मनोज इनानी, लालू शिरगावे, हरीश देवाडिगा, अमोल थोरवत, अभिजित कवडे, शुभम सातपुते, रमेश माळी, सोहेल सय्यद, विनोद ढोले, सलमान चौगले, निलेश नांद्रे, प्रतिक पेटकर, राकेश लिगाडे, शुभम खोत, रोहन माधव, विष्णू देढे, अभिषेक चिंचणे, सोमनाथ कांबळे, निशांत साळी, आलोक चव्हाण तसेच सहकारी खेळाडू यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे राजरत्न यांनी सांगितले.
राजरत्न कांबळे यांच्या निवडीमुळे परिसरातील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा