ICHMH51NEWS.IN
9921600800

‘ऑपरेशन सिंदूर’ कायमस्वरूपी सुरू ठेवावे लागणार मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांचे प्रतिपादन; आपटे वाचन मंदिराच्या व्याख्यानमालेत देशभक्तीची लाट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘ऑपरेशन सिंदूर’ कायमस्वरूपी सुरू ठेवावे लागणार

मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांचे प्रतिपादन; आपटे वाचन मंदिराच्या व्याख्यानमालेत देशभक्तीची लाट

इचलकरंजी :
 येथील आपटे वाचन मंदिराच्या वसंत व्याख्यानमालेतील सातवे विचारपुष्प मा. मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त) यांनी प्रभावी वक्तृत्वातून श्रोत्यांसमोर उलगडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर बोलताना त्यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. दहशतवादाविरोधातील लढा कायमस्वरूपी सुरू ठेवावा लागणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शत्रूच्या दहशतवादी कारवायांविरोधात लढणे अत्यावश्यक असून नागरिकांनीही नेहमी सजग आणि सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनात देशप्रेम आणि देशभक्तीची भावना जागृत झाली. व्याख्यानादरम्यान “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यामुळे आजचे व्याख्यान अभूतपूर्व ठरले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

मोहिनी गर्गे यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत मनोगत व्यक्त केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा