ICHMH51NEWS.IN
9921600800

मोफत बुद्धिबळ प्रशिक्षणातून १३९२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन फिडे, इचलकरंजी चेस अकॅडमी व लायन्स क्लबचा संयुक्त उपक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत बुद्धिबळ प्रशिक्षणातून १३९२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

फिडे, इचलकरंजी चेस अकॅडमी व लायन्स क्लबचा संयुक्त उपक्रम

इचलकरंजी :
फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघ) यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी चेस अकॅडमीतर्फे फिडे चेस एज्युकेशन अ‍ॅण्ड सोसायटी व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १३९२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये बुद्धिबळ खेळाची प्राथमिक माहिती नसलेल्या नवोदित खेळाडूंना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. महिला व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. नांदणी, तारदाळ, रुई, वळीवडे, बाहुबली, लाट आदी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळाचे नियम, विविध डावपेच, ‘लिचेस’ या ऑनलाइन व्यासपीठाची माहिती तसेच “ह्युमन चेस बोर्ड” उपक्रमाद्वारे अनुभवात्मक प्रशिक्षण देण्यात आले. पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष ऑनलाइन गटही तयार करण्यात आला आहे.
या उपक्रमात इचलकरंजी चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक फिडे स्कूल इन्स्ट्रक्टर शैलेश सुभाष होनकट्टी, एमसीए-सीआयएस वरिष्ठ स्कूल इन्स्ट्रक्टर समेद सुनील पाटील, प्रियांका कपिल ठोमके, श्रुती सुनील देसाई, वर्षा शैलेश होनकट्टी, प्रतिक पाटील, एमसीए-सीआयएस स्कूल इन्स्ट्रक्टर कपिल नारायण ठोमके, अजित लक्ष्मण निर्मळे, रुपाली अजित निर्मळे तसेच आयसीए प्रशिक्षक ज्योती निलेश देसाई, वर्षा अरिंजय काश्मिरे आणि भारती शीतल कुरडे यांनी प्रशिक्षक म्हणून योगदान दिले.
या उपक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कोल्हापूर बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि फिडे यांच्या मान्यतेने सर्व विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

प्रमाणपत्र वितरित करताना लायन्स क्लबचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा