यंत्रमाग वीज सवलत नोंदणीस मुदतवाढ
इचलकरंजी :
यंत्रमागधारकांच्या वीज सवलतीसाठी आवश्यक ऑनलाईन नोंदणीस तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली असून, यासाठी आमदार Rahul Awade यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र अर्ज प्रक्रियेत अडचणी येत असल्याने मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. आमदार आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यानंतर वस्त्रोद्योग मंत्रालयाने तीन महिन्यांची मुदतवाढ देणारा शासन आदेश जारी केला. दरम्यान, यंत्रमाग उद्योजकांनी मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी, अन्यथा वीज सवलत बंद होऊ शकते, असे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








