ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिर मध्ये बाल वाचन संस्कार शिबिर संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर मध्ये बाल वाचन संस्कार शिबिर संपन्न.   

  इचलकरंजी:
आपटे वाचन मंदिर मध्ये इचलकरंजी नगरीतील इ. 7 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बाल वाचन संस्कार शिबिर गुरुवार दि. 23 एप्रिल ते बुधवार दि. 29 एप्रिल 2026 अखेर ग्रंथालयाच्या बजाज हॉलमध्ये आयोजित केले होते. सध्या मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी, वाचन संस्कृती जपावी आणि जोपासावी या हेतूने हे शिबिर आयोजित केले होते. यामध्ये वाचनाच्या आवाजाचा चढ-उतार, मराठी व्याकरण, कविता वाचन, कथा वाचन, नाट्य वाचन, विज्ञान कथा याबाबत ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री. काशिनाथ जगदाळे, कार्यवाह प्रा. मोहन पुजारी, सहकार्यवाह डॉ. सुजित सौंदत्तीकर, संचालक श्री. संजय सातपुते, संचालिका सौ. मीनाक्षी तंगडी व माया कुलकर्णी यांनी आणि तज्ञ शिक्षक श्री. उमेश खराडे सर, श्री तापकीरे सर,
सौ. चित्कला कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचा शुभारंभ तज्ञ शिक्षिका सौ. प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिराच्या समारोपास नामवंत लेखिका सौ. ज्योती जोशी ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात वाचनाचे महत्त्व कसे आहे हे उदाहरणासह विषद केले. या शिबिराचे नियोजन व सूत्रसंचालन सौ. प्राची कुलकर्णी यांनी केले. या कामी सौ. आरती मगदूम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात स्वागत उपाध्यक्ष श्री. काशिनाथ जगदाळे यांनी, प्रास्ताविक कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी, पाहुण्यांचा परिचय सहकार्यवाह डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यास ग्रंथालयाच्या वतीने एक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांमधून कु. मयुरी सोमनाथ रुग्गे व कु. आराध्या अतुल जाधव यांना मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काझी यांच्या देणगीतून उत्कृष्ट बाल वाचक पुरस्कार देण्यात आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा