ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी पाणीप्रश्नी शिव-शाहू आघाडी आक्रमक घोषणाबाजी करत आमदार-खासदारांचा निषेध; मटकी फोडून आंदोलन,सुळकुड योजनेच्या अमलबजावणीसाठी सभागृहात डिजिटल पेहरावातून मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी पाणीप्रश्नी शिव-शाहू आघाडी आक्रमक

घोषणाबाजी करत आमदार-खासदारांचा निषेध; मटकी फोडून आंदोलन,सुळकुड योजनेच्या अमलबजावणीसाठी सभागृहात डिजिटल पेहरावातून मागणी

इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सुळकुड पाणीपुरवठा योजना तातडीने राबविण्याच्या मागणीसाठी शिव-शाहू आघाडी आक्रमक झाली आहे. महापालिकेच्या सभेत आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार आणि खासदारांचा निषेध नोंदविला. तसेच मटकी फोडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
“सुळकुड योजना झालीच पाहिजे” अशी ठाम भूमिका घेत शिव-शाहू आघाडीच्या नगरसेवकांनी विशेष डिजिटल पेहराव परिधान करून सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी नगरसेवक मदन कारंडे, संजय कांबळे, उदयसिंग पाटील, रणजित जाधव, संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, सागर राणे, परवेज गैबान, नंदकुमार पाटील, क्रांती आवळे, स्मिता तेलनाडे, पद्मा सावरतकर, स्वाती लोखंडे, यास्मिन तासगावे आणि रुपाली कोकणे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
शहरवासीयांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी सुळकुड योजना तातडीने मंजूर करून तिची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मटकी फोडून निषेध व्यक्त करताना शिवशाहू आघाडीचे नगरसेवक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा