सुळकूड अंमलबजावणीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब,पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड उद्भव धरून पाणी योजना अंमलबजावणी साठी प्रयत्न करण्याचा निर्णय आज पाणीप्रश्नी
झालेल्या विशेष सभेत घेण्यात आला, सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उदय धातूंडे होते. व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे नगर सचिव राहुल पोटे उपमहापौर अनिल डाळ्या उपस्थित होते.प्रारंभी विरोधी पक्षनेते व गटनेते उदयसिंग पाटील यांनी इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेसाठी गेल्या दहा वर्षांमध्ये ४६३ कोटी रुपये खर्च झाला असून एवढ्या पैशांमध्ये एखादी नवीन योजना किंवा थेट धरणातून पाणी आले असते असे सांगितले त्यानंतर कृष्ण पाणी योजनेसाठी आपला हिस्सा १८ कोटी रुपये होता मात्र आतापर्यंतच्या पाईपलाईन बदलण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च झालेला आहे तर ही गळकी योजना म्हणून इचलकरंजी शहराला मिळाली असेही सांगत मंजूर असलेली सुळकुड पण अंमलबजावणी होत नसल्याने अंमलबजावणी साठी सामूहिक प्रयत्न करावे असा मुद्दा मांडला. त्यानंतर बोलताना माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी २१ मार्च २०२५ रोजी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त महापालिकेकडे आहे का त्या बैठकीत काय निर्णय झालेला आहे जर त्या बैठकीमध्ये १५ एप्रिल २०२५ पर्यंत निर्णय घेण्याचे ठरले असताना गेल्या १३ महिन्यापासून याबाबत बैठक का झाली नाही व निर्णय का झाला नाही खाली पासून पर्यत सत्ता असताना इचलकरंजीच्या गंभीर पाणी प्रश्न निर्णय होत नाही याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.आपण शेतकऱ्यांचे पाणी घेत नाही, पंचगंगा प्रदूषण जेथे होते तेथे कारवाई आवश्यक आहे,तज्ञ समितीचा अहवाल काय झाला प्रशासन ठोस भूमिका का घेत नाही असे मुद्दे मांडत पंचगंगा वाचवायची असेल तर उगमापासून संगमापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे.सुळकुड योजना राबवण्यासाठी आमदार-खासदार यांच्यासोबत आपण मुख्यमंत्र्यांचे पर्यंत जाऊन हा विषय संपवला पाहिजे असे मत मांडले. विजयालक्ष्मी महाजन यांनी विठ्ठल चोपडे यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले होते आता सुद्धा सर्वजण एकत्र येऊन सुळकुड पाणी प्रश्न सोडूया असे आवाहन केले.ध्रुवती दळवाई यांनी बोलताना इचलकरंजीकर म्हणून जर सुळकुड पाणी प्रश्न एकजूट केली आणि कोणताही श्रेयवाद न आणता जर एकत्रितपणे प्रयत्न केले तर नक्कीच पाणी मिळू शकेल असे सांगितले. मनीषा नवनाळे यांनी सर्वजण सत्ताधारी विरोधक असा भेदभाव न करता एकत्र येऊन प्रयत्न करूया असे मत मांडले. पद्मा सावरतकर यांनी पाणीप्रश्नी नगरसेवकांना खूप त्रास होत असून राजकारणामुळे हजारो कोटी जीएसटी देणाऱ्याचे शहराला पाणी मिळत नाही याबाबत सर्वजण प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. मदन कारंडे यांनी बोलताना आपण पंधरा-सोळा हजार नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असून आजपर्यंत पाण्यासाठी जेवढा त्रास झाला नाही तेवढा गेल्या चार महिन्यात झालेला आहे,नागरी प्रश्नात सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजमल असून इचलकरंजी शहरासाठी सुळकुड सारखी मंजूर असलेली योजना राबवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे मत व्यक्त केले. तानाजी पोवार यांनी सुळकुड बाबतीत शासनाकडे जो अहवाल दिला आहे त्यामध्ये ज्या त्रुटीआहेत ते आपण शासनास पटवून देऊया आणि कृष्णा योजना बळकटीकरण करून सद्यस्थितीत गावाला पाणीपुरवठा सुरळीत करूया असे मत व्यक्त केले.उपमहापौर अनिल डाळ्या यांनी नवीन योजना तर राबवल्यास पण पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आपल्या हिस्स्याचा प्रयत्न करू काळा ओढा संपूर्णपणे शुद्ध करून त्यामध्ये असलेले नैसर्गिक झरे पुनर्जीवित करण्याची गरज असल्याचेही सांगितले. सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गटनेते विठ्ठल चोपडे यांनी सुळकुड योजनेसाठी शासनाने वेळोवेळी पाणी शिल्लक असल्याचे कळवले होते त्याचप्रमाणे पूर्ण पत्र व्यवहार आपल्याकडे उपलब्ध असून कुणाच्यातरी राजकीय दबावांमध्ये आपल्याला पाणी कमी पडते असा अहवाल झाला असावा अशी शक्यता व्यक्त करत त्यामुळेच योजना लांबणीर पडली असून सद्यस्थितीत इचलकरंजी शहराला फक्त पिण्याचे पाणी जरी सुळकुड योजनेतून मिळाले तरी औद्योगिक पाणी व इतरत्र पाणी आपल्याला कृष्णा व पंचगंगेतून उपसा करता येऊ शकतो व आपले इतर पुढे ३० वर्षाची गरज भागवू शकते अशा भूमिकेतून आपण योजनेसाठी एकत्रितपणे पूर्ण ताकतीने शासनाकडे प्रयत्न करूया असे सांगितले. यादरम्यान नगरसेवकांना दिलेल्या अजेंडा व टिप्पणी मध्ये इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा साठी असणाऱ्या ३० पंपापैकी फक्त दहाच पंप चालू असल्याचे लेखी स्वरूपात देण्यात आले होते मात्र २७ पंप चालू असल्याचे बाजी कांबळे यांनी सभागृहात सांगितले व झालेली चूक प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगताच विरोधकांनी बाजी कांबळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला याबाबत बाजी कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली एकंदरीत पाणी योजनेसाठी व पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आमदार खासदार व लोकप्रतिथी यांना घेऊन आपण नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना भेटून पाठपुरावा करण्याची बैठकीत ठेवण्यात आले चर्चेत तेजश्री भोसले रूपाली कोकणे, क्रांती आवळे यांनी सहभाग घेतला.
विरोधकांनी सुळकुड योजनेच्या अंमलबजावणी साठी पेहराव करत सभागृहात प्रवेश केला
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







