मजुरीवाढ संदर्भात सोमवारी निर्णायक बैठक ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताना तोडगा काढण्याचे आदेश
कोल्हापूर :
पॉवरलूम उद्योगाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज कोल्हापूर येथे माननीय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूर जिल्हा पॉवर लूम असोसिएशनचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते पदाधिकारी तसेच ट्रेडिंग धारक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना सोमवारी दि. १८ मे रोजी दुपारी १२ वाजता संबंधित सर्व घटकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत पॉवरलूम उद्योगाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तातडीने मार्ग काढण्याचे आदेशही देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असेही सांगितल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे पॉवरलूम उद्योगाशी संबंधित व्यापारी, उद्योजक आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





