पुनर्वसनाच्या विलंबाने पुनरागमनाचा हाळवणकर समर्थकांचा आग्रह चर्चेत
विशेष वृत्त- अभिजित पटवा
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार असलेले दोनवेळा आमदारकी भूषविलेले सुरेश हाळवणकर यांच्या विधानपरिषद उमेदवारी लांबत असताना पुनर्वसनाऐवजी पुमरागमनाचा दबाव कार्यकर्त्यांकडून वाढत असल्याने इचलकरंजीचे वातावरण ढवळून निघत आहे.
इचलकरंजी विधासभा मतदारसंघात मिरज दंगलीनंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशराव हाळवणकर निवडून आले.पहिल्याच आमदारकीच्या कारकिर्दीत विरोधी पक्षात असूनही कामाचा धडाका व स्पष्ट भूमिका मांडत विविध प्रश्नांना न्याय देत संघटनात्मक कौशल्याचा जोरावर ते पुन्हा २०१४ साली दुसऱ्यांदा आमदार झाले.सत्तेत असल्यामुळे साहजिकच कामाचा व्याप वाढत गेला मात्र इचलकरंजीचा वस्त्रोद्योग प्रश्नास न्याय न देता आल्याची भूमिका जनतेत गेल्याने व माजी आमदार प्रकाश आवाडेंचा ऐनवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढवल्याचा फायदा झाला व सुरेश हाळवणकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला,निवडून आल्यानंतर तातडीने आमदार प्रकाश आवाडे यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिल्याने आवाडे भाजपसोबत राहिले,विरोधी पक्षात असूनही भाजप समर्थनाचा किल्ला त्यांनी अडीच वर्षं निकराने लढवला,त्यानंतर महायुतीची सत्ता आल्यावरही आवाडे भाजपसोबत राहिले. त्यातच त्यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी राहुल आवाडे हे आमदारकीचे पुढील उमेदवार असतील असे त्यांनी जाहीर केले त्यानंतर २५ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांचा राहुल आवाडेंसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरेशराव हाळवणकर यांच्या अनुकूलतेनंतर भाजप प्रवेश झाला.त्यानंतर तिकीट राहुल आवाडे यांना मिळाल्यानंतर हाळवणकर समर्थक कार्यकर्ते हे संतप्त झाले मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निकाल लागण्याचा आधी सुरेशराव हाळवणकर यांना आमदार केले जाईल याबाबत लायन्स ब्लड बँकेतील मेळाव्यात शब्द दिला गेला.आवाडे हाळवणकर कटुता कमी करण्यासाठी वस्त्रोद्योग महसंघाचे अशोकराव स्वामी यांनी प्रयत्न केले.विधानसभा निवडणुकीत राहुल आवाडे मोठ्या फरकाच्या मताधिक्याने आमदार झाले त्यामध्ये सुरेशराव हाळवणकर यांचा मोलाचा वाटा होता.
त्यानंतर वेळोवेळी आशेवर असलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होत गेला,या महिन्यात पार पडलेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठीही त्यांचे नाव न आल्याने त्याचप्रमाणे महापालिकेत नगरसेवकात काही अंशी कुरबुरी सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्यावर पुनर्वसनाचा नाद सोडून पुनरागमनाचा आग्रह वाढवला आहे.
२ जून रोजी माजी आमंदार सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसासाचे निमित्त साधत निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.सर्व कार्यक्रम हे भाजप कार्यकर्ते करणार असून या निमित्ताने काही उघड भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
सुरेशराव हाळवणकर हे अभ्यासू आमदार होते,त्यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे भारतीय जनता पार्टीचे जाळे कोल्हापूर जिल्ह्यात विणले गेले.त्याचबरोबर पेजप्रमुख,बुथप्रमुख या त्यांच्याच संकल्पना महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने स्वीकारल्या असताना त्यांचा पराभव व आवाडेना पक्षात दिलेले स्थान अजूनही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नसल्याचे दिसुन येत आहे.
आवाडेंच्या प्रचारात नसलेले विरोधी प्रचार केलेले,महापालिकेत तिकीट नाकारलेले सर्व कार्यकर्ते एकत्र झाले असून हाळवणकरांच्या वाढदिवसाचे नेटके नियोजन करत आहेत.आपल्या नेत्याप्रती असलेली प्रामाणिक भावना व पक्षाने न्याय देण्यात केलेला विलंबाच्या परिस्थितीत माजी आमदार सुरेशराव हाळवणकर हे जोमाने सक्रिय होऊन परत एकदा जनतेला न्याय देतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरागमन करतील अशा पद्धतीने कार्यकर्ते नियोजन करत आहेत.
शिव शाहु आघाडीचा हाळवणकराना पाठिंबा-
कदाचित भाजपमध्ये २ गट झाले आणि त्यातून महापालिकेत हाळवणकर गटास पाठिंबा देण्याचे स्पष्ट मत २ दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत उदयसिंग पाटील यांनी व्यक्त केले.
गटबाजीची सुरवात आवाडे समर्थकांकडून-
भारतीय जनता पार्टीत कोणताही गट नसतो फक्त पक्ष असतो असे वातावरण आता निर्माण केले जात असले तरी नावापुढे आवाडे समर्थक लावून गटबाजीची सुरवात आवाडे समर्थकांनीच केल्याचे भाजप कार्यकर्ते सांगत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800
