ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेणु प्राथमिक शाळेत इयत्ता ८ वीच्या वर्गाचा शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेणु प्राथमिक शाळेत इयत्ता ८ वीच्या वर्गाचा शुभारंभ

इचलकरंजी, दि. १८ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेणु प्राथमिक शाळेस शासनाकडून इयत्ता ८ वीच्या वर्गास मान्यता प्राप्त झाली असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या या वर्गाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, उपसभापती पुनम माळी, नगरसेविका तेजश्री भोसले, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार तसेच पैलवान अमृत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता ८ वीच्या वर्गास मिळालेल्या मान्यतेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, शाळेच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमहापौर अनिल डाळ्या यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गुळगुळे सर, ना. नि. पाटील सर, प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

पैलवान अमृत भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून या शाळेत इयत्ता ८ वीचा वर्ग सुरू होऊ शकला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये यामुळे आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे.

शुभारंभ करताना आयुक्त पल्लवी पाटील,शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे,अमृतमामा भोसले व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा