ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

इचलकरंजी, दि. २१ जून : भारतीय संस्कृतीची जगाला लाभलेली महत्त्वपूर्ण देणगी असलेल्या योगाचा प्रसार व्हावा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राजाराम स्टेडियम येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

इचलकरंजी महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपमहापौर अनिल डाळ्या आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.

कार्यक्रमात प्रशिक्षक सुहास पवळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदुंडे व सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या वृंदा भुतडा आणि निवेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. योगामुळे तणावमुक्त व निरोगी जीवन जगण्यास मदत होत असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

योग दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर,उपमहापौर अनिल डाळ्या व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा