ICHMH51NEWS.IN
9921600800

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वविजेत्यांचा गौरव.इचलकरंजीच्या वृंदा भूतडा व निवेश पाटील यांचा आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते सत्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वविजेत्यांचा गौरव.इचलकरंजीच्या वृंदा भूतडा व निवेश पाटील यांचा आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते सत्कार

इचलकरंजी:
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून इचलकरंजीतील वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णयश मिळवणाऱ्या वृंदा भूतडा व निवेश नितेश पाटील यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शाल, श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांची फ्रेम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद अंतर्गत सोहम योग अकॅडमीच्या विद्यार्थिनी वृंदा भूतडा हिने फॉरवर्ड बेंड कॅटेगरीमध्ये ९ देशांतील स्पर्धकांवर मात करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती इचलकरंजीची पहिली कन्या ठरली.
तसेच सब-ज्युनिअर बॉईज गटातील निवेश नितेश पाटील याने पारंपरिक योगासन आणि फॉरवर्ड बेंडिंग या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक जिंकत दुहेरी सुवर्णयश संपादन केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून यशस्वी वाटचाल करत त्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले होते.
या दोन्ही खेळाडूंनी मिळून भारतासाठी तीन सुवर्णपदके जिंकत इचलकरंजी व महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सत्कार समारंभ आमदार डॉ. राहुल आवडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दोन्ही खेळाडूंना फेटा बांधून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रा. शेखर शहा, अहमद मुजावर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अजिंक्य रेडेकर तसेच मार्गदर्शक सुहास पवळे उपस्थित होते.
या यशामागे प्रशिक्षक सुहास पवळे, पूनम खोत व निलेश कागीनकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. वृंदा व निवेश यांच्या यशामुळे संपूर्ण इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वृंदा भुतडा व निवेश पाटील यांचा सन्मान करताना आ.राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा