शासनाचे यंत्रमाग धारकांना लाचार करायचे धोरण-विनय महाजन,
आमदार आवाडेंची सारवासारव.
इचलकरंजी
काल झालेल्या महाराष्ट्र सरकार च्या कॅबिनेट मध्ये राज्यातील यंत्रमागधारकांना विज बिलातील अतिरिक्त सवलत साठी लादण्यात आलेली ऑनलाईन नोंदणी ची अट शिथिल करण्यात आली हे खरे परंतु याची अंमलबजावणी १५मार्च २०२४ पासून होणार आहे काय याचे स्पष्टीकरण केलेले नाही व ही अट मार्च २०२५ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे रद्द करण्यात आलेली नाही म्हणजे यंत्रमागधारकांना पुन्हा ते वेठीला धरणार आहेत असे या निर्णयामुळे सिद्ध झालेले आहे
यंत्रमागधारकांना शासन सातत्याने लाचार करत आहे व पुन्हा पुन्हा ते लाचारच करणार आहेत
जो पर्यंत आपल्या विज बिलात अतिरिक्त सवलत १५ मार्च २०२४ पासून लागू झालेली बिले येत नाहीत तो पर्यंत कुणीही कुणाचे अभिनंदन करू नका , साखर खाऊ नका , पेढे भरवू नका असेही विनय महाजन यांनी म्हंटले आहे.
वीज सवलतीचा निर्णय कायमस्वरूपी : आमदार आवाडे
२७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपयांच्या वीज सवलतीचा आज झालेला निर्णय हा कायस्वरूपी लागू राहणार आहे. परंतु काही मंडळीकडून
हा निर्णय केवळ मार्च २०२५ पर्यंतच शिथिल करण्यात आल्याबद्दलचा अपप्रचार केला जात आहे. सवलतीचा निर्णय कायमस्वरूपी असल्याने कोणीही गैरसमज पसरवू नये. आणि यंत्रमागधारकांनी अफवाना बळी पडू नये, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे व निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800