ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी :
श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे ज्युनियर विभाग अर्थशास्त्र विषयांतर्गत दि. ११ जुलै २०२६ रोजी “जागतिक लोकसंख्या दिन”या निमित्ताने भित्तिपत्रिकेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डीकेएएससी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनील भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. वसुंधरा कबनूरकर यांनी प्रास्ताविक केले.जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सुनील भोसले यांनी वाढती लोकसंख्या, तिचा पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. लोकसंख्या नियंत्रण तसेच शाश्वत विकासासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अधोरेखित केली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रुती जोशी मॅडम कार्यक्रमास उपस्थित होत्या.तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. रितिका पाल यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले.
लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रा.डॉ श्रुती जोशी,डॉ सुनील भोसले व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

एनडीकेला अभय कुणाचे? १४.५ कोटींच्या कचरा ठेक्यावर प्रश्नचिन्ह; ठराव होऊनही कारवाई रखडली क्यूआर कोड गैरवापर, सेकंडरी पॉईंटचा वाद, कर्मचाऱ्यांचा संप, रोज सुमारे दोन लाखांचे बिल; नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप

एनडीकेला अभय कुणाचे? १४.५ कोटींच्या कचरा ठेक्यावर प्रश्नचिन्ह; ठराव होऊनही कारवाई रखडली क्यूआर कोड गैरवापर, सेकंडरी पॉईंटचा वाद, कर्मचाऱ्यांचा संप, रोज सुमारे दोन लाखांचे बिल; नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप