कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाइपलाइनला गळती; इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत
इचलकरंजी :
इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या दाबनलिकेला रविवारी (१२ जुलै) शिरढोण येथील एमएसईबीजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, रविवारी दुपारी १ वाजल्यापासून पाणी उपसा बंद करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गळतीची दुरुस्ती सोमवारी (१३ जुलै) सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत पाणी उपसा पूर्णपणे बंद राहणार असल्याने शहरातील विविध भागांना अपुरा पाणीपुरवठा होणार असून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्यात होणाऱ्या अडचणीबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आ
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






