ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई सिव्हील इंजिनिअरींगच्या १२ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई सिव्हील इंजिनिअरींगच्या १२ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड

इचलकरंजी –
येथील डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची बांधकाम क्षेत्रातील नामांकित ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या सिव्हील विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहेत.
‘रोहन बिल्डर्स’ ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली रिअल इस्टेट मधील अग्रगण्य कंपनी आहे. रोहन बिल्डर्सच्या माध्यमातून अनेक आयटी पार्कस, ऑफीस कॉम्पलेक्स विकसीत झाले आहेत. दर्जेदार बांधकाम, नाविण्यपूर्ण संकल्पना आणि गुणवत्तापूर्ण प्रकल्पांमध्ये कंपनीने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्‍वाला आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे.  त्या अनुशंगाने व उद्योगविश्‍वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
रोहन बिल्डर्स या कंपनीने डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागात कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केला होता या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सिव्हील विभागातील सतरा विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी -अदित्य तुपारे, अक्सा बागवान, रोहन बावडेकर, मयुर देसाई, अथर्व धडके, रोहित गडयाल, रुपेश गायकवाड, सई खाडे, सचिन नाईक, अथर्व पाटील, दर्शन वाळकुंजे व ओंकार रोकडे.
विद्याथ्यार्ंना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.के.पाटील, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील रोहन बिल्डर्स या कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

एनडीकेला अभय कुणाचे? १४.५ कोटींच्या कचरा ठेक्यावर प्रश्नचिन्ह; ठराव होऊनही कारवाई रखडली क्यूआर कोड गैरवापर, सेकंडरी पॉईंटचा वाद, कर्मचाऱ्यांचा संप, रोज सुमारे दोन लाखांचे बिल; नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप

एनडीकेला अभय कुणाचे? १४.५ कोटींच्या कचरा ठेक्यावर प्रश्नचिन्ह; ठराव होऊनही कारवाई रखडली क्यूआर कोड गैरवापर, सेकंडरी पॉईंटचा वाद, कर्मचाऱ्यांचा संप, रोज सुमारे दोन लाखांचे बिल; नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप