अनधिकृत स्टॉल रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे इचलकरंजी महापालिकेला निर्देश
इचलकरंजी
इचलकरंजीतील अनधिकृत तात्पुरत्या स्टॉलच्या उभारणीप्रकरणी महेश शिवाजी भिसे यांनी अॅड. उमेश रामचंद्र घोरपडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने इचलकरंजी महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकेत १६ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या न्यायालयीन आदेशाचे पूर्ण पालन होत नसल्याचा दावा करण्यात आला होता. याचिकेसोबत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली छायाचित्रेही सादर करण्यात आली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने यापूर्वीचे आदेश अद्याप लागू असल्याचे स्पष्ट केले. तसेच अनधिकृत स्टॉल उभारले जाणार नाहीत, यासाठी महानगरपालिकेने कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश दिले. या आदेशाची प्रत पालनासाठी महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश शासकीय वकिलांना देण्यात आले असून, त्यानंतर न्यायालयाने रिट याचिका निकाली काढली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







