ICHMH51NEWS.IN
9921600800

घरेलू मोलकरीण कामगारांच्या १० प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घरेलू मोलकरीण कामगारांच्या १० प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा

 

इचलकरंजी :

सर्व श्रमिक संघ, कोल्हापूरच्या वतीने मोलकरीण (घरकाम) कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, पालकमंत्री, विकास आयुक्त, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ तसेच आमदार राहुल आवाडे यांना सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

निवेदनात मोलकरीण (घरकाम) कामगार हा समाजातील अत्यंत उपेक्षित व असंघटित घटक असून अत्यल्प मानधनावर काम करूनही त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, नियमित उत्पन्न आणि वृद्धापकाळात आधार मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अनेक पात्र नोंदणीकृत महिला कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

संघटनेने मोलकरीण कामगारांसाठी स्वतंत्र १,५०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद, प्रलंबित गृहउपयोगी संचांचे वितरण, प्रलंबित सन्मानधन तातडीने अदा करणे, वृद्धापकाळ पेन्शन योजना, ईएसआय आरोग्य सुविधा, मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, अपघात विमा व नैसर्गिक मृत्यू सहाय्य, सणासुदीला विशेष आर्थिक मदत, किमान वेतन निश्चित करणे आणि सर्व शासकीय योजनांचा पारदर्शक लाभ देणे अशा १० प्रमुख मागण्या केल्या आहेत.

या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा मोलकरीण (घरकाम) कामगार संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा नीता भिसे, सचिव शीतल वागावकर, संघटक सुनील बारवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जानकी भोईटे यांना निवेदन देताना घरेलू मोलकरीण संघटनेच्या सदस्या.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

एनडीकेला अभय कुणाचे? १४.५ कोटींच्या कचरा ठेक्यावर प्रश्नचिन्ह; ठराव होऊनही कारवाई रखडली क्यूआर कोड गैरवापर, सेकंडरी पॉईंटचा वाद, कर्मचाऱ्यांचा संप, रोज सुमारे दोन लाखांचे बिल; नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप

एनडीकेला अभय कुणाचे? १४.५ कोटींच्या कचरा ठेक्यावर प्रश्नचिन्ह; ठराव होऊनही कारवाई रखडली क्यूआर कोड गैरवापर, सेकंडरी पॉईंटचा वाद, कर्मचाऱ्यांचा संप, रोज सुमारे दोन लाखांचे बिल; नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संताप