डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयांना कृतज्ञतानिधी
इचलकरंजी, ता. १५ : डीकेटीईचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा ध्वजारोहण समारंभ शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील वीर शहीद जवान रोहीत परशुराम खन्नीकुडे यांच्या वीरपत्नी श्रीमती शशीकला खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते झाला.
यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात डीकेटीई परिवाराच्या वतीने हुतात्मा जवानाला श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतानिधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांच्या हस्ते वीरपत्नी शशीकला खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांकडे मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सपना आवाडे यांनी, सीमेवर जवान अहोरात्र कर्तव्य बजावत असल्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात डीकेटीई परिवार सदैव सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, सोशल विभागाचे डॉ. ए. आर. बलवान, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या कुटुंबीयांना डीकेटीईच्या वतीने कृतज्ञतानिधीचा धनादेश सुपूर्द करताना सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, डॉ. सौ. एल. एस. आडमुठे व मान्यवर.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







