ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात

इचलकरंजी : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रकाश मोरबाळे यांनी स्वातंत्र्य लढ्याचा आढावा घेत काँग्रेस ही देशाची प्रमुख संघटना असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने तसेच तरुणांच्या मानसिकतेवर भाष्य केले. देशातील शिक्षणपद्धती आणि एकूणच व्यवस्थेत बदल करण्याची गरज असून हा बदल भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून केवळ काँग्रेस पक्षच घडवू शकतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योगपती विठ्ठलरावजी डाके, रहमान चाचा खलिफा, महादेव आण्णा कांबळे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, शहर काँग्रेस अध्यक्ष अजित मिणेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांनी केले.

ध्वजारोहणवेळी घेतलेले छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा