ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवतीर्थ रिक्षा मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन रिक्षाचालक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवतीर्थ रिक्षा मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन

रिक्षाचालक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

इचलकरंजी : छत्रपती शिवाजी महाराज एसटी स्टँड येथील शिवतीर्थ रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. इचलकरंजी विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनसूर सावनूरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष इराणा घोळसंगी, उपाध्यक्ष खलील हिप्परगी, नूरभाई नायकोडे, कय्युम जमादार, सिकंदर लोकापुरे, दीपक यादव, सुनील गायकवाड, बाबासाहेब मुजावर, असलम मनेर, शकील बाणदार, दिलावर सावनुरकर, महंमद मुल्ला, आसिफ मुल्ला, सलीम बागवान, बाळू नायबा, शब्बीर लोकापुरे, शब्बीर मिस्त्री, मुबारक बागवान, अख्तर मुल्ला, विनोद घाडगे, नजीर बागवान, अक्रम, सुनील यादव, बागवान, शौकत मुल्ला यांच्यासह रिक्षाचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजवंदनानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

रिक्षा मित्र मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी व नागरिकांना सुरक्षित वाहतूक सेवा देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा