समाजवादी प्रबोधिनीत ध्वजारोहण संपन्न
इचलकरंजी ता.१५ भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनी , प्रबोधन वाचनालय आणि
चंद्रशिला इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनीच्या प्रांगणात पूजा आगम या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रसाद कुलकर्णी ,आनंद खोडे,मंदार मोरे ,पूर्वा पाटील ,आदर्श चव्हाण ,दुरत कोतवाल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, भारताची आजवरची वाटचाल आणि भविष्याची दिशा या विषयावर मनोगते व्यक्त केली. यावेळी शशांक बावचकर, प्रा. रमेश लवटे, सद्दाम कारभारी, अरुणकुमार मोरे, अंकुश गरगटे, सतीश कांबळे, पांडुरंग पिसे, दयानंद लिपारे,शकील मुल्ला ,शिवाजी शिंदे, अशोक माने, शहाजी धस्ते ,मनोहर जोशी, भीमराव नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भार्गवी प्रभावळकर यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







