ICHMH51NEWS.IN
9921600800

पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीत चुरशीचा थरार,तरुण मराठा बोट क्लब ‘अ’ सांगलीवाडी प्रथम; हजारोंची गर्दी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीत चुरशीचा थरार,तरुण मराठा बोट क्लब ‘अ’ सांगलीवाडी प्रथम; हजारोंची गर्दी

इचलकरंजी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने पंचगंगा नदीत आयोजित पारंपरिक होड्यांच्या भव्य शर्यतीत चुरशीचा थरार अनुभवायला मिळाला. सहा बोट क्लबच्या सहभागामुळे शर्यतीत सुरुवातीपासूनच कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. होड्यांचा वेग, स्पर्धकांचा जोश आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे पंचगंगा नदीकिनारा दुमदुमून गेला.
श्री वरद विनायक मंदिर परिसरात झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ आमदार सुरेशराव हाळवणकर, रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रमोद बचाटे, सचिन माळी, राहुल जाणवेकर, संग्राम स्वामी, हणुमंत वाळवेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
सन १९७० पासून सुरू असलेल्या या पारंपरिक जलक्रीडेचे आयोजन वरद विनायक मंदिर भक्त मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
तरुण मराठा बोट क्लब ‘अ’ व ‘ब’ सांगलीवाडी, डिग्रज बोट क्लब, वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी, श्री हजरत सय्यद बादशहा बोट क्लब व युवाशक्ती बोट क्लब कवठेसार या सहा संघांनी सहभाग घेतला.
अटीतटीच्या लढतीत तरुण मराठा बोट क्लब ‘अ’, सांगलीवाडी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याला २१ हजार १ रुपये व शिल्ड देण्यात आले. युवाशक्ती बोट क्लब, कवठेसार द्वितीय (१५ हजार १ रुपये), डिग्रज बोट क्लब तृतीय (११ हजार १ रुपये), तर वरद विनायक बोट क्लब, इचलकरंजी चतुर्थ (७ हजार १ रुपये) ठरला.
आमदार अशोकराव माने (बापू), रवींद्र माने, माजी अपर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे,दिलीप मुथा,महाजन गुरुजी, अशोक स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
होड्यांचा थरार पाहण्यासाठी महिला, लहान मुले, युवक व ज्येष्ठ नागरिकांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी नदीकिनारी गर्दी केली होती. शिस्तबद्ध नियोजनामुळे स्पर्धा उत्साहात व सुरळीत पार पडली.

होड्यांच्या शर्यती व पारितोषिक वितरण समारंभावेळीचे छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा