ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी भूषण’ पुरस्काराने कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सन्मान.श्री संत नामदेव समाज सेवा मंडळाच्या वतीने कृतज्ञता सोहळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी भूषण’ पुरस्काराने कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सन्मान.श्री संत नामदेव समाज सेवा मंडळाच्या वतीने कृतज्ञता सोहळा

इचलकरंजी
 श्री संत नामदेव समाज सेवा मंडळाच्या वतीने इचलकरंजीचे ज्येष्ठ व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व, सहकार महर्षी तथा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाबद्दल ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री संत नामदेव भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून झाली. सई उरुणकर यांनी श्री नामदेव वंदना सादर केली. समाज भगिनींनी स्वागतपर नृत्य सादर केले. मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या सामाजिक, सहकार व सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्याचा सन्मान करताना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सत्काराबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नामदेव समाज सेवा मंडळाचे आभार मानले. समाजबांधवांच्या आशीर्वादाच्या शिदोरीवर दादा शंभरी पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समाजांतर्गत युवा उद्योग पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सीमा उरुणकर यांनी केले. युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी आभार मानले.कार्यक्रमास महिला अध्यक्षा सरोज उरुणकर, पतसंस्था चेअरमन उमाकांत कोळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इचलकरंजी भूषण’ पुरस्काराने कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सन्मान करताना नामदेव समाजाचे प्रतिनिधी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा