इचलकरंजीत पहिल्या क्लासिकल चेस स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ,१५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; सहा वयोगटांत रंगणार चुरशीच्या लढती
इचलकरंजी :
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित स्व. मालतीबाई रामचंद्र देशपांडे स्मृती क्लासिकल चेस स्पर्धेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. इचलकरंजीतील ही पहिली क्लासिकल चेस स्पर्धा असून, १५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या आयोजनास पुरोहित चेस अकॅडमी व इचलकरंजी चेस अकॅडमीचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत U-7, U-9, U-11, U-13, U-15 आणि U-18 अशा सहा वयोगटांचा समावेश आहे.
उद्घाटनप्रसंगी लायन्स क्लबच्या अध्यक्षा रेखा सारडा, सचिव श्रद्धा साटपुते, खजिनदार सुनीता अग्रवाल, क्लब प्रशासक महेश सारडा, लिंगराज कित्तुरे, संदीप सुतार, स्पर्धा संचालक कृष्णावतार भराडिया तसेच पुरोहित चेस अकॅडमीचे श्रेयस पुरोहित उपस्थित होते.
इचलकरंजी चेस अकॅडमीचे संस्थापक व मुख्य पंच शैलेश होनकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक वायचळ, मोहिनीराज डांगे, वर्षा होनकट्टी, प्रियंका ठोमके व श्रुती देसाई यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. रुपाली निर्मळे यांनी सहाय्य केले.
क्लासिकल चेसमुळे खेळाडूंची विचारशक्ती, संयम, एकाग्रता आणि रणनीती विकसित होण्यास मदत होत आहे. पुरोहित चेस अकॅडमीकडून खेळाडूंना गेम लिहिण्यासाठी रायटिंग पॅड, पेन, पाण्याची बाटली तसेच नाश्ता देण्यात आला.
उद्या (१६ ऑगस्ट) तीन राउंड होणार असून, खेळाडूंना पॅड-पेनसह दोन वेळा नाश्ता देण्यात येणार आहे. स्पर्धेमुळे इचलकरंजीच्या बुद्धिबळ क्षेत्राला नवी चालना मिळाली आहे.
स्पर्धा शुभारंभ प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







