ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण उत्साहात महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते राजाराम स्टेडियमवर ध्वजारोहण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण उत्साहात,महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते राजाराम स्टेडियमवर ध्वजारोहण.

इचलकरंजी :
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक व सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तसेच शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, NCC व MCC पथकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी शहरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महानगरपालिका सेवेतून यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, माजी सैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण वेळी मानवंदना देताना आ.राहुल आवाडे,महापौर उदय धातूंडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा