बिशप्स इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
इचलकरंजी : बिशप्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सौ. यास्मिन तासगावे तसेच प्रसिद्ध उद्योगपती ज्ञानचंद पंजवानी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन इम्तियाज म्हैशाळे यांनी केले. यावेळी प्राचार्य आयुब आवटी तसेच हुसेन गड्याळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रिन्सिपल वैशाली कोळी यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







