इचलकरंजीत पहिली क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न
इचलकरंजी :
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, इचलकरंजी चेस अकॅडमी आणि पुरोहित चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. मालतीबाई रामचंद्र देशपांडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी लेट. बाळासाहेब दाते, लायन्स ब्लड सेंटर, दाते मळा येथे झालेल्या स्पर्धेत १५२ खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण लायन्स क्लबच्या अध्यक्षा रेखा सारडा, सचिव श्रद्धा सातपुते, खजिनदार सुनीता अग्रवाल, महेश सारडा, प्रीती पोद्दार, हेमा डाळिया, टूर्नामेंट डायरेक्टर कृष्णअवतार भराडीया, महेंद्र बालर, माजी अध्यक्ष कृष्णकुमार दमानी, प्रसाद कबाडे, पुरोहित चेस अकॅडमीचे श्रेयस पुरोहित व फिडे स्कूल चेस कोच शैलेश होनकट्टी यांच्या हस्ते झाले.
स्पर्धा ७, ९, ११, १३, १५ व १८ वर्षांखालील वयोगटांमध्ये घेण्यात आली. विजेत्यांना एकूण १७ हजार ४०० रुपयांची रोख पारितोषिके व ६० ट्रॉफी, तर सहभागी खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून दीपक वायचळ, शैलेश होनकट्टी, मोहिनीराज डांगे, वर्षा होनकट्टी, प्रियंका ठोमके व श्रुती देसाई, तर सहाय्यक पंच म्हणून कपिल ठोमके यांनी काम पाहिले.
विविध गटांमध्ये अथर्व आलदार, नंदिनी सारडा, तेजस खावत, श्रेया चौगुले, वेदांत बांगड, साची जैथलिया, रोनक झवार, सिया परांजपे, आरुष पाटील, अन्वी सूर्यवंशी, शिवराज कामते, मोक्षा पाटील यांच्यासह खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेला पालक व बुद्धिबळप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







