कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बाराच्या नगरसेविका व महिला बालकल्याण सदस्य सौ. स्नेहल दीपक रावळ यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्त स्पोर्ट्स विभागांतर्गत भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून तलवारबाजी प्रशिक्षक श्री. प्रणव रावळ व त्यांचे विद्यार्थी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींसमोर फेंसिंगचे डेमॉन्स्ट्रेशन करून त्याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी दोरी उड्या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अक्षता खाडे प्रथम, हर्षदा आजगेकर द्वितीय व प्राची सूर्यवंशी हिने तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व प्रत्येक विद्यार्थिनींमध्ये खिलाडू वृत्ती जोपासली गेली पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच विविध खेळांमध्ये सहभाग असला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पोर्ट्स विभाग प्रमुख डॉ. निशिगंधा पाटील यांनी उत्तम नियोजन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800