हजरत सय्यद मख्तुमवली दर्गाह येथे ईद-ए-मिलाद निमित्त महाप्रसाद; चार हजार भाविकांनी घेतला लाभ
इचलकरंजी:
येथील गावभागातील हजरत सय्यद मख्तुमवली दर्गाह येथे ईद-ए-मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे महाप्रसाद (नियाज) चे आयोजन करण्यात आले होते. शहर परिसरातील सुमारे चार हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
पैगंबर जयंतीचे औचित्य साधून इंदिरानगर येथून मोठ्या उत्साहात भव्य सद्भावना यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा गावभागातील हजरत सय्यद मख्तुमवली दर्गाह येथे पोहोचल्यानंतर दुवा पठण करण्यात आले. त्यानंतर सद्भावना यात्रेची सांगता झाली.
यावेळी दरवर्षीप्रमाणे उरुस कमिटीच्या वतीने महाप्रसाद (नियाज) वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा शुभारंभ धोंडीलाल शिरगांवे, रवींद्र माने, कैश बागवान, परवेझ गैबान आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी पैगंबर जयंती कमिटीचे अध्यक्ष अल्ताफ शेख, उपाध्यक्ष अमन मुजावर, खजिनदार अमीर गवंडी, सेक्रेटरी साकीब मुजावर, अनिस मुजावर, लुकमान समडोळे, इनायत मुजावर, सोनू लाटकर, माशुम मुजावर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







