राज्यातील यंत्रमागधारकांना विज बिलातील अतिरिक्त सवलत साठी अजून किती वाट पहावी लागणार?- विनय महाजन
इचलकरंजी
१३ ऑगस्ट २०२४ रोजी च्या कॅबिनेट मध्ये यंत्रमागधारकांना देण्यात येणाऱ्या विज बिलातील अतिरिक्त सवलत साठी घालण्यात आलेली नोंदणी ची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु अजून त्याचा अध्यादेश काढण्यात आलेला नसून जो पर्यंत वस्त्रोद्योग सचिव तसा अध्यादेश काढत नाहीत तो पर्यंत ही अतिरिक्त सवलत यंत्रमागधारकांना मिळणार नाही असे मत विनय महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
१३ तारखेला मंजूर झालेल्या विषयाचा अध्यादेश निघण्या करीता एवढा विलंब का होत आहे सरकार स्वतःच्या राजकीय फायद्याचे विषय मंजूर झाल्या झाल्या त्वरित त्याचा अध्यादेश काढते मग यंत्रमागधारकांना शासना कडून हा दुजाभाव का होत आहे
जर हा अध्यादेश एक ते दोन दिवसात नाही काढला तर ऑगस्ट महिन्याच्या वापराचे विज बिल हे देखील जादा दराने निघण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने हा अध्यादेश त्वरित काढून यंत्रमागधारकांना दिलासा द्यावा
वस्त्रोद्योग विभागातील सर्वच लोकप्रतिनिधी ना विनंती आहे की त्यांनी हा अध्यादेश लवकरात लवकर काढण्यासाठी प्रयत्न करावेत व या अध्यादेश मध्ये ही सवलत १५ मार्च २०२४ पासून लागू करण्यात यावी असा अध्यादेश काढून घ्यावा तरच राज्यातील सर्वच यंत्रमागधारकांना याचा फार मोठा फायदा होईल असेही महाजन यांनी शेवटी म्हंटले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800