भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात साजरा.- जिल्हा कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर-
रविवार दिनांक २५/०८/२०२४ रोजी भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा चे त्रैवार्षिक अधिवेशन जी. पी. आय सोसायटी हाॅल , लम्क्षीनगर , पाटील गॅस एजन्सी समोर, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले . अधिवेशनाची सुरूवात मा. श्री. मुकुंद जोशी ह्यांनी श्रमिक गीताने केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री . एस. एन. पाटील ( कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ) व प्रमुख पाहुणे मा. श्री. रविंद्र देशपांडेजी ( केंद्रीय कार्य समिति सदस्य व अखिल भारतीय प्रभारी स्वावलंबी भारत अभियान ) , मा. श्री. सुधाकर पाटील ( उपाध्यक्ष भा. म. सं. महाराष्ट्र प्रदेश , कोल्हापूर जिल्हा प्रभारी ) मा. श्री. शामराव गोळे मामा ( भा. म. सं. कोल्हापूर विभाग संघटनमंत्री ) ह्यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा, श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी व भारत माता यांच्या फोटोस पुष्पहार घालून झाले . सौ. ज्योती तावरे ( भा. म. संघ महाराष्ट्र प्रदेश महिला प्रतिनिधी ) ह्यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली व सर्वाचे श्री . एस. एन पाटील ह्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच अधिवेशनास विविध जिल्ह्यांतून उपस्थित असलेल्या पदाधिकारीचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. . सौ. अनुजा धरणगावकरसो ( भा. म. संघ महाराष्ट्र प्रदेश महिला प्रतिनिधी ) ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तद्नंतर मागील दोन वर्षांतील विविध क्षेत्रातील दिवंगत संघटनेशी संलग्न व्यक्तीना श्रध्दांजली वाहण्यात आली. मा. श्री. रविंद्र देशपांडेजी ह्यांनी आपल्या भाषणात भारतीय मजदूर संघ ७० व्या वर्षात पदार्पण करीत असताना आपल्या पुढील आव्हाने पुर्ण करण्यासाठी घरोघरी जाऊन भारतीय मजदूर संघ पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगितले. संघटना स्थापनेपासून ते आत्तापर्यंत अवितरत चालू असलेली घौडदौड तसेच ७० व्या वर्षात विविध आयामातून तळागाळातील कामगारांपर्यत भारतीय मजदूर संघ पोहचविण्यासाठी कार्य करण्यासाठी उद्बोधन केले.
भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा सचिव श्री. प्रविण जाधव ह्यानी सन २०२२-२४ च्या अहवाल वाचनात २०२२ मधील चेतना यात्रा, २१ डिसेंबर २०२२ चा मुंबई भव्य मोर्चा , कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य सेवितील आशा सेविकांना संघटनेच्या रिती निती वर विश्वास ठेवून संघटनेत केलेला प्रवास तसेच केंद्र व प्रदेशाच्या सुचनेनुसार घेण्यात आलेले विविध उपक्रम व कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे संपन्न झाले बद्दल आभार मानले.
पुढील सत्रात विविध कामगारांच्या विविध विषयांवर एकूण ५ ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने,
१) कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी,
२) असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितता,
३) महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवून त्यांना योग्य न्याय मिळवून देणे,
४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, वीज कंत्राटी कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा.
५) आशा सेविकांना सरकारी नोकरी सामावून घ्यावे, वैद्यकीय सोयी सुविधा द्याव्यात, भविष्य निर्वाह निधी मध्ये सामावून घ्यावे , मानधनवाढीची रक्कम मागील फरकासहीत मिळावी, पेन्शन मिळावी , वेतन हमी , भाऊबीज भेट न देता बोनस द्यावा, तसेच गटप्रवर्तकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरून उच्चशिक्षित आशा सेविकांना पदोन्नती द्यावी व त्यासाठी त्यांना वयात शिथिलता द्यावी , भरपगारी रजा व सुट्या मंजूर करण्यात याव्यात. इ. विविध प्रकारचे ठराव मांडण्यात आले व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात श्री. एस . एन. पाटील जिल्हा अध्यक्ष ह्यांनी भा. म. संघ कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी विसर्जित केल्यावर नवीन कार्यकारणी निवडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा. श्री. सुधाकर पाटील ह्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवीन जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली
भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर जिल्हा नवीन कार्यकारिणी २०२४ ते २०२७
१) श्री. रविंद्र एडके – ( इंजिनिअरींग GPI )- अध्यक्ष
२) श्री. श्रीकांत पाटील (नगरपालिका )- कार्याध्यक्ष
३) श्री. प्रविण जाधव ( वीज ) – चिटणीस
४) श्री. शिवाजी चौगुले (सुरक्षा ) – संघटनमंत्री
५) श्री. अमॄत लोहार ( बॅक ) – कोषाध्यक्ष
९) श्री. तेजेस मडिवाल ( इंजिनिअरींग GPI ) – उपाध्यक्ष
सह नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली व सर्वाचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
श्री . शामराव गोळे मामा ह्यांनी अधिवेशनाचे समारोपीय भाषणात सर्व जिल्हा कार्यकारिणीस पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व कामगारांनी अशीच एकजुटीने कार्य करण्यासाठी तयार राहून जिल्हा पदाधिकार्ण्यानी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आवाहन केले. उपस्थित सर्वाचे आभार श्री. एस. एन. पाटील ह्यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा राजेशिर्के मॅडम ह्यांनी केले .
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उद्योगातून कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते. साधारणता ९० पुरुष व ४० महिला उपस्थित होत्या.
भारतीय मजदूर संघ जिंदाबाद …देशभक्त मजदूरो एक हो एक हो राष्ट्रभक्त मजदूरो एक हो एक हो … अशा घोषणा देऊन उत्साहाने सांगता करण्यात आली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800