देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त आज असीम सरोदे यांचे “नागरिकांसाठी संविधान”व्याख्यान
इचलकरंजी
इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांचे योगदान मोठे आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर जी राज्यघटना तयार झाली त्या राज्यघटनेची समाजवाद , धर्मनिरपेक्षता , संसदीय लोकशाही,सामाजिक-आर्थिक- राजनैतिक न्याय ,विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता आणि बंधुता यासह ही सर्व मूल्ये त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतानाच त्यांनी सहकार, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या आधारे झालेली नवभारताची उभारणी हा आपला महत्त्वाचा राजकीय ,सामाजिक व सांस्कृतिक ठेवा आहे. हे ध्यानात घेऊन देशभक्त बाबासाहेब खंजिरे अखेरपर्यंत कार्यरत राहिले.
तो ठेवा जतन करून अधिक सुदृढ पणाने पुढे नेणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. या भूमिकेतून भारतीय राज्यघटनेच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आणि समाजवादी प्रबोधिनी व राहुल खंजिरे फाउंडेशन यांच्या सहकार्याने ख्यातनाम अभ्यासू वक्ते संविधान व नागरीहक्क विश्लेषक,वकील
ॲड. असीम सुहास सरोदे (पुणे) यांचे ‘नागरिकांसाठी संविधान’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान रविवार ता. १५ सप्टेंबर २०२४ दुपारी ३.३० वाजता महेश क्लब ऑफ इचलकरंजी, मंगलमूर्ती टॉकीज जवळ, राधाकृष्ण चौक, इचलकरंजी येथे होणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने, नव्या तरुण पिढीने ,विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या संविधानाचे तत्त्वज्ञान नेमकेपणाने समजून घेणे आणि त्यानुसार आपला वर्तन व्यवहार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.म्हणूनच या व्याख्यानाला इचलकरंजी परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगरसेवक राहूल खंजिरे यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800