विभागीय खो खो स्पर्धेत कन्या महाविद्यालयाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक.
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी च्या खो-खो संघाने कोल्हापूर विभागीय खो-खो स्पर्धा गुरुवार दिनांक २०/१०/२४ रोजी संपन्न झाल्या.
त्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १४ संघानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.पहिला सामना डी वाय पाटील,कसबा बावडा यांच्या विरुद्ध झाला,
त्यामध्ये महाविद्यालयाच्या संघाने एक डाव राखून पाच गुणांनी विजय मिळवला.
दुसरी मॅच डॉक्टर घाळी कॉलेज गडहिंग्लज यांच्याविरुद्ध होता, त्यामध्ये आपण चार गुणांनी विजय मिळवला.त्यानंतर थर्ड प्लेसची मॅच विजय सिंह कॉलेज पेठ वडगाव यांच्यामध्ये झाली त्यामध्ये विजय मिळवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये खालील सहभागी खेळाडू कॅप्टन सानिका दाडमोडे, जुबेर मुल्ला, दिपाली जाधव, भाग्यश्री निर्मळ,शुभांगी डंके, आनंदिता दळवी, नेहा मुळे, स्नेहल कांबळे, सानिका पाटील, गौरी खोत, सानिका देवकते, श्रावणी कदम, अंकिता हांडे आणि वंदना शर्मा या सर्वांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. बाबासाहेब दुधाळे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सविता भोसले तसेच जिमखाना सदस्य सर्वांचे खेळाडूंना सहकार्य लाभले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800