यड्राव येथे सहावर्षीय बालिकेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला,बालिका गंभीर जखमी : सांगली सिव्हीलमध्ये उपचार सुरू
यड्राव-
यड्राव (ता.शिरोळ) येथे पार्वती औद्योगिक वसाहत शेजारी असणार्या शिरगावे मळा येथे सहावर्षीय बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. नैना सुभेदार वर्मा (वय 6, मुळ रा. उत्तर प्रदेश सध्या यड्राव शिरगावे मळा) असे गंभीर जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही घटना पहाटेच्या दरम्यान घडली. तिच्यावर सांगली सिव्हील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नैना ही पहाटेच्यावेळी बाहेर शौचास गेली होती. यावेळी हिच्यासोबत आई ही होती. आई ही काही अंतरावर थांबली होती. यावेळी १५ ते २० भटक्या कुत्र्यांनी नैना हिच्यावर हल्ला चढविला यावेळी बालिकेला जवळपास १५० ते २०० मीटर कुत्र्यांनी ओढून नेल्याने ती गंभीर जखमी झाली. यावेळी नैना हिच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर आणि पाठीवर कुत्र्यांनी लचके तोडली आहेत. यामध्ये ती गंभीर जखमी झाले आहे. तिला प्राथमिक उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार न मिळाल्याने सांगली सिव्हील रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800