इचलकरंजी शहरात कुत्र्यांचा धुमाकूळ,विविध भागातील १७ जणांना चावा,८ जण उपचारार्थ रुग्णायलात.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका देऊनही उपद्रव थांबलेला नसून शनिवारी विविध भागांतील १७ जणांना कुत्र्याने चावा घेतला. यापैकी ८ जण इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार घेत आहेत.कागवाडे मळा, रिक्रेशन हॉल,तीन बत्ती चार रस्ता आदि भागात कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.
भटक्या कुत्र्याच्या बाबतीत महापालिका प्रशासन उदासीन असून फक्त कुत्री चावली तरच जुजबी उपाययोजना करून तात्पुरती कारवाई करायची व नंतर परत थंड बसायचा कार्यक्रम नियमोट सुरू आहे.याबाबत अनेक वेळा सामाजिक संघटनांनी आवाज उठवला असला तरी मार्ग निघत नसल्याने महापालिका प्रशासनावरील विश्वास उडू लागला आहे.केबिन मध्ये थंड हवा खात बसणाऱ्या अधिकाऱ्याना याची जाणीव कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येत कुत्र्यांनी उपद्रव केल्यावर तरी महापालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







