कोट्यावधीचा ठेका देऊनही कचरा उठावात अनियमितता.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग. महापालिकेचे कर्मचारी मक्तेदारावर मेहेरबान.

इचलकरंजी
इचलकरंजी शहरात नुकत्याच एका कंपनीला कचरा उठावाचा ठेका देण्यात आला,जवळपास १४ कोटींचा ठेका देऊनही या कंपनीला समाधानकारक कामकाज करण्यात अपयश येत आहे.जवळपास १५ दिवसाच्या कालावधीनंतरही गावात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.विकली मार्केट मध्ये मोठया प्रमाणात कचरा साठलेला असून गुरुवारी खाली गावात एका ठिकाणी कचरा उठाव करणाऱ्या गाडीत महानगरपालिका कर्मचारी कचरा भरत असतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.विविध भागात स्वच्छता करण्याचे काम करायचे सोडून कुणाच्या आदेशाने हे कर्मचारी मक्तेदारांच काम सांभाळत आहेत याबाबत जोरदार चर्चा होत असून तातडीने सदर कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी होत आहे.
अतिक्रमण निर्मूलन पथकास कर्मचारी पुरविण्यास हात झटकणाऱ्या आरोग्य विभाग कुणाच्या दबावात मक्तेदारावर मेहेरबान आहे,यामागे कोणता अर्थ दडला आहे याची चर्चा करदाते नागरिक करत आहेत.
मक्तेदाराकडे जबाबदारी असताना महापालिका कर्मचारी कचरा उचलत असतानाचा व्हिडीओ
https://youtu.be/e6VOA_cktDA?si=6aZmMOfVhqX-pgP7
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







