राज्यातील विकासाची गंगा अविरत राहण्यासाठी राहुल आवाडेना निवडून द्या-आ.प्रकाश आवाडे
इचलकरंजी
राहुल आवाडे आमदार होणार हे निश्चित आहे. पण आपण जिंकणार म्हणून कोणीही गाफिल राहू नका. यंदाची लढाई ही आर या पार अशी असल्याने सर्वांनी तळागाळापर्यंत पोहचून अधिकाधिक मतदान कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या. मी राजकारणातून निवृत्त झालेलो नाही. पण राज्यातील गतीमान विकासाची गंगा अविरत राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार असले पाहिजे आणि त्यासाठीच राहुल आवाडे यांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
इचलकरंजी शहर व परिसरातील विविध सहकारी संस्थांमधील चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या प्रमुख बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते. राज्यात मागील अडीच वर्षातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याचा गतीमान विकास केला. या सरकारच्या माध्यमातून प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे महायुतीचेच सरकार आणायचे आहे. सर्वसामान्यांच्या विश्वासाच्या शिदोरीवर वाटचाल सुरु आहे. त्या प्रेमाला आणि विश्वासाला तडा जाऊया द्यायचा नाही. त्यासाठी गाफिल न राहता जोमाने कामाला लागा, असे आवाहन केले.
स्वप्निल आवाडे यांनी, सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे आशिर्वाद आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आवाडेसुध्दा जोमाने कार्यरत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करत आहेत. म्हणूनच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे आण्णांचे काम, भाजपाची ताकद आणि सर्वांचे मतरुपी आशिर्वाद यामुळे राहुल आवाडे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. विलास गाताडे यांनी, आपल्याला विकासाच्या मुद्यावर लढायचे आहे. दादा आणि आण्णांच्या आशिर्वादाने राहुल आवाडे यांची वाटचाल सुरु आहे. भाजपाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत विविध योजनांच्या माध्यमातून उभारी दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रश्न राहुल आवाडे निश्चितपणे सोडवतील. त्यासाठी त्यांना साथ द्या, असे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रकाश दत्तवाडे यांनी केले. आभार गजानन लोंढे यांनी मानले. याप्रसंगी बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, एम. के. कांबळे, अहमद मुजावर, चंद्रकांत इंगवले, सतिश कोष्टी यांच्यासह विविध संस्थांचे संचालक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800