घरफोडीतील आरोपीना अटक,४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त,शहापूर पोलिसांची कामगिरी.
इचलकरंजी
शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुलै महिन्यात घडलेल्या घरफोडीच्या अनुषंगाने किरण सुभाष पाटील वय ३४ वर्षे रा. राणाप्रताप चौक, गावभाग इचलकरंजी व विनायक गजानन कुंभार, २६ वर्षे, रा लोहार गल्ली टाकवडे वेस यांना अटक करून त्यांच्याकडुन ५९ ग्रॅम सोने, ८५ ग्रॅम चांदीचे दागिने व मोपेड असा एकुण ४,८०, २००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे.शहापूर शिरोळ व जयसिंगपुर येथील प्रत्येकी १ असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
शहापुर पोलिस घरफोडीचा तपास करताना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून ४,६०,२००/- किमतीचे सोन्याचे ५९ ग्रॅम वजनाचे दागीने व चांदीचे ८५ ग्रॅम वजनाचे दागिने २०,०००/- रुपये किमतीची ग्रे रंगांची ऍक्टिवा गाडी हस्तगत केली.
वरील कारवाई जिल्हापोलिस प्रमुख महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,डी वाय एस पी समीरसिंह साळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सचिन सुर्यवंशी,अविनाश मुंगसे, असिफ कलायगार,रोहित डावाळे, आयुब गडकरी,शशिकात ढोणे यांनी केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास मा वरीष्ठांचे मार्गदर्शनाने पो.अं महेश कोरे करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800