डी.के.ए.एस.सी महाविद्यालयाच्या हर्षदा करंबेळकरची राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड.
राज्यस्तरीय योगासन स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या. या झालेल्या स्पर्धेमध्ये डी के ए एस सी महाविद्यालयाच्या हर्षदा संदीप करंबेळकर या खेळाडूने योगासनाची प्रात्यक्षिके अत्यंत चपळाईने सादर केली. तीने सादर केलेल्या अद्वितीय प्रात्यक्षिकांमुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. राष्ट्रीय योगासन स्पर्धा या १२ ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहेत.
या यशस्वी कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांनी तिचे अभिनंदन केले. तर या खेळाडूला प्रा. विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगिवाले, श्री. अमित कुंडले यांचे मार्गदर्शन लाभले. तर श्री. सुहास पवळे सरांचे प्रशिक्षण मिळाले.महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी , शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800