शहर वाहतूक सल्लागार समितीची आज बैठक,१५ महिन्यांनी मुहूर्त.
इचलकरंजी
इचलकरंजी शहर वाहतूक सल्लागार समितीची मागील बैठक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती सदर बैठकीत सुचवलेल्या सूचना यावर कारवाई तर झालीच नाही पण तब्बल १५ महिने चालढकल करत पोलीस प्रशासनाने बैठक लावण्याचे टाळले.अखेर शहर वाहतूक सल्लागार समितीच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचे जाहीर केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने वाहतूक सल्लागार समितीची बैठक आयोजित केली आहे.
शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता रोटरी क्लब येथे बैठक होणार असून यासाठी पोलीस प्रशासनाने महापालिका, एसटी महामंडळ,महावितरण यांच्यासह संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकारी वर्गास आमंत्रित केले आहे सदर बैठकीमध्ये इचलकरंजी शहरातील क्रेनचे वाढती कारवाई, अरेरावी तसेच वाहतूक पोलिसांची उद्धट वर्तणूक याचबरोबर सर्व विषम पार्किंग, दीपावली बाजार यासारखे मुद्द्यांवर चर्चा होणार असून आज बैठकीत काय निर्णय होतो? व त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होते याकडे शहरवासियांचे यांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिका प्रशासनाची अनास्था
शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत ही महापालिकेचे अधिकारी फक्त सूचना लिहून घेत कारवाई करण्याचे आश्वासन देतात मात्र वाहतूक पोलिसांना काम करत असताना कोणतेही सहकार्य करत नाहीत.याचबरोबर वाढत्या अतिक्रमणाचा शहर वाहतूक पोलिसांना काम करताना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. महापालिका प्रशासनाचे चुकीच्या कारभाराचे खापर नेहमी वाहतूक पोलिसांच्या वर फोडले जाते महापालिका आणि पोलीस प्रशासन यामध्ये अजिबात समन्वय नसून प्रत्येक वेळी दोघे एकमेकाकडे बोट दाखवण्याचे काम करत असतात. त्यामुळे आजच्या बैठकीत महापालिकेचे आयुक्त उपस्थित राहतात का आणि काय भूमिका मांडतात याकडे शहराचे लक्ष असणार आहे..

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800