शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत समस्यांचा पाढा-महापालिका प्रशासनाशी चर्चा करून निर्णय-समीरसिंह साळवे.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत समस्यांचा पाढा-महापालिका प्रशासनाशी चर्चा करून निर्णय-समीरसिंह साळवे.

इचलकरंजी
पंधराव्या महिन्यात मुहूर्त लागलेल्या इचलकरंजी शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. सर्व समस्या ऐकून घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाशी चर्चा करून वाहतुकीचे नियोजन करण्यावर आमचा भर राहील अशी स्पष्टोक्ती दिली. मागील बैठक पार पाडून जवळपास १४ महिन्यानी शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक लागली. बैठकीच्या सुरुवातीला महापालिकेचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने समिती सदस्यांनी बहुतांशी समस्या या महापालिकेशी निगडित असताना महापालिका प्रशासनाने या बैठकीस उपस्थित का राहत नाही याबाबत विचारणा केली तर सर्वानी महापालिकेतच जाऊया असा मुद्दा मांडला.उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे यांनी या समितीबाबत महापालिकेशी चर्चा झाली असून महापालिकेने त्यांच्या स्तरावर बैठक घेण्याची ठरवलेले आहे त्या बैठकीमध्ये आम्ही समितीची भूमिका मांडू व इचलकरंजी शहराचे वाहतुकीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ अशी समजूत काढल्याने उपस्थित सदस्य बैठकीत बसले. त्यानंतर विविध समस्या मांडताना काही सदस्यात खडाजंगी उडत होती.इचलकरंजी ही वस्त्रोद्योगनगरी असून यामध्ये दीपावली बाजाराच्या वेळी दहा दिवस राज्य महामार्ग बंद का ठेवला? शहर वाहतूक शाखेने एसटी प्रशासनाला कोणाच्या सांगण्यावरून पत्र दिले जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांनी वाहतुकीचे मार्ग बदलण्याबाबत कोणताही जाहीर नामा काढला नसताना शहर वाहतूक शाखेचे प्रभारी निशानदार यांनी वाहतूक वळवण्यास एस टी महामंडळास या संदर्भात पत्र देण्याचे कारण काय? यासह शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी हे पॉईंटवर नसतात तसेच इतरत्र चिरीमरी गोळा करत असतात.त्याचबरोबर क्रेनची  वाढती कारवाई यामुळे क्रेन बंद करावी.. महापालिकेने तीन गाड्या बसतील असे पट्टे मारलेले आहेत नागरिकांनी पट्ट्याच्या आत गाडी लावली तर त्यांची काय चूक महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या पट्टे मारण्याच्या पद्धतीमुळे डबल पार्कींगची कारवाई होत आहे व त्याचा भुर्दंड वाहनधारकांना बसत आहे. इचलकरंजी शहरांमध्ये पार्किंगची कोणतीही व्यवस्था मुख्य रस्त्यावर नसताना एकेरी मार्ग असताना सम विषम पार्किंग बंद करावे त्याचबरोबर भगतसिंग बागेजवळ नो पार्किंगचा फलक लावल्याने नागरिकांनी गाड्या लावायच्या कुठे असे प्रश्न उपस्थित झाल्यावर याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समीर सिंह साळवे यांनी सांगितले.शाळा सुटताना तेथे शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी असावेत,इचलकरंजी शहरातील नदीवेस-सांगली रोड- पंचगंगा साखर कारखाना व कबनूर येथे सिग्नल असावेत तसेच अतिक्रमण मोहीम राबवताना त्या मोहिमेचे इचककरंजी महानगरपालिकेने फेसबुक लाईव्ह करावे त्यामुळे आपल्या गावात अतिक्रमण वाढण्यास कोण कारणीभूत आहे हे जनतेला समजेल.याचबरोबर इचलकरंजी शहरातील सीसीटीव्हीचे काय झाले? अवजड वाहतूक शहरात ट्रान्सपोर्ट धारक करत असून त्यामुळे टेंपोचालकांचा रोजगार बुडत आहे तरी यासाठी ट्रक टर्मिनल व्हावे व टेंपो चालकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत,इचलकरंजी स्मशानभूमी पार्किंगचे फलक लावावेत,तसेच कॅटेलायझर लावण्यात यावेत,
गावातील रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत अशा पद्धतीचे मुद्दे मांडण्यात आले.
 यावर उत्तर देताना समीरसिंह साळवे यांनी क्रेनच्या कारवाईत त्रुटी असतील तर त्या सुधारणा केल्या जातील,योग्य पद्धतीने पट्टे मारलेले असतील तरच गाड्या उचलल्या जातील कोणत्याही पद्धतीने वाहतूक शाखेचे कर्मचारी चुकीची वागणूक करत असले तर तातडीने तक्रार द्यावी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत इथून पुढे आपणास यामध्ये बदल दिसेल.सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी इचलकरंजी शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातून नवीन सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याने व दुरुस्ती जुन्या सीसीटीव्हीची होत नसल्याचे त्यांनी मान्य केले. महापालिकेची समन्वय साधून एक गाडी बसेल असेच पट्टे मारण्यात येतील असेही सांगितले. बैठकीत उमेश पाटील, सदा मलाबादे,अमित बियाणी,अरुण बांगड,अशोक शिंदे,सचिन जाधव, जानवेकर,शशिकला बोरा,उर्मिला गायकवाड,विनय महाजन,अभिजीत पटवा आदींनी भाग घेतला. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे, शिवाजीनगरचे प्रभारी सचिन पाटील, गावभागचे प्रभारी प्रमोद शिंदे,शहापूरचे सचिन सूर्यवंशी,शहर वाहतूक शाखेचे प्रशांत निशाणदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिवाजी पाटील,सतीश शिंदे एस टी महामंडळाचे सागर पाटील,बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे उपस्थित होते.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More