डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात “भारतातील डिजिटल क्रांती व भविष्यवेध ” या विषयावर कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत अर्थशास्त्र विभागामार्फत “भारतातील डिजिटल क्रांती व भविष्यवेध ” या विषयावर दि. १३/०१/२०२५ रोजी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर सर हे होते. पहिल्यासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विलिंग्डन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनोहर कोरे व दुसऱ्या सत्रासाठी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर प्रा. मेहुल जाधव हे उपस्थित होते. त्यांनी “भारतातील डिजिटल क्रांती व भविष्यवेध ” या विषयाशी सखोल असे विद्यार्थ्याना अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून संकल्पना समजून सांगितल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक अर्थशास्त्रविभाग प्रमुख डॉ.ए.एच.बोगुलवार यांनी केले, तसेच अग्रणी महाविद्यालय योजनेबाबत अग्रणी महाविद्यालय योजनेच्या समन्वयक डॉ. एन. एच. शेख मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. पाटील यांनी तर आभार कार्यक्रमाचे संयोजक डॉ.व्ही.आर.शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. एस.जी गवंडी, प्रा.आर.डी.अत्तार यांनी परिश्रम घेतले. यावेळी अग्रणी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबद्दल आपली मनोगते व्यक्त केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800