अतिक्रमण हटवा,नियमित पाणीपुरवठा करा इचलकरंजी नागरिक मंचकडून विविध नागरी समस्यांसाठी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन.
इचलकरंजी
इचलकरंजी नागरिक मंचने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे,फुटपाथ स्वच्छता करून चालण्यायोग्य करणे,अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न, स्ट्रीट लाईट दुरुस्ती दिरंगाई,भाजी मार्केट दुरुस्ती या मागण्यांसाठी अति आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन दिले.
इचलकरंजी नागरिक मंचने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आढावा घेत महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आक्षेप नोंदवला या निवेदनात नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असून, त्यावर महानगरपालिकेचे धोरण निष्क्रिय असल्याचे मंचने नमूद केले आहे. आठवड्याभरात अतिक्रमण हटवण्यात अपयश आले, तर शहरवासियांसोबत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी पायी चालण्याच्या फुटपाथवर अतिक्रमण असून, झाडेझुडपे वाढलेली आहेत. फुटपाथ रिकामे करण्याची आणि स्वच्छता राखण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असून दीड महिन्यापासून आश्वासन देऊनही पाणीपुरवठा विभाग नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करत नाही,गावभागात १० दिवस पाणी नसून आता व्हॉल्व्ह खराब झाल्याचे कारण दिले आहे.तातडीने उपाययोजना करत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी निवेदनात केली आहे.
विद्युत विभागाकडून स्ट्रीट लाईट दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा होत असून, मक्तेदारांवर कारवाई करावी,तसेच श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार पुतळ्यास सजावट प्रकरणी कारवाईचे दिलेले आश्वासनाचे काय झाले?अशी विचारणा मंचने केली आहे.
हु. आण्णारामगोंडा पाटील शाळेसमोरील भाजी मार्केटची दुरवस्था झाली आहे.फुटलेल्या ड्रेनेजची दुरुस्ती करावी तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिक मंचने अति.आयुक्त सुषमा शिंदे यांना या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली असून अति आयुक्तांनी त्वरित या मुद्द्यावर मिटिंग आयोजित करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे डॉ सुप्रिया माने,मिना कासार,कल्पना माळी,अमृत पारख,नितीन ठिगळे,चंद्रकांत मांगलेकर,संजय डाके,महेंद्र जाधव,हरीश देवाडिगा,उदयसिंह निंबाळकर,उमेश पाटील, अमित बियाणी, अभिजित पटवा उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800