इचलकरंजी येथे खुनाचा गुन्हा उघड;आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व इचलकरंजी पोलीस ठाण्याची कारवाई.
इचलकरंजी
इचलकरंजी येथे १७ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजता विशाल आप्पासो लोकरे याचा उत्तम चौकाजवळ खुन करण्यात आला. आरोपी सागर वाघमारे, संतोष मन्नोळी, व यश चौगुले यांनी अज्ञात कारणावरून विशाल लोकरेला मारहाण करून, उसाच्या ट्रॅक्टरखाली ढकलले. त्यामुळे त्याच्या मांडी, पोट आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मरण पावला.
मयताच्या भावाने इचलकरंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपामुळे कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
संयुक्त कारवाईत यश चौगुले (२६ वर्षे, रा. वाल्मिकी नगर, संत मळा, इचलकरंजी) याला पंचगंगा साखर कारखाना परिसरातून अटक करण्यात आली. तर सागर वाघमारे (२९ वर्षे, रा. संत मळा, इचलकरंजी) आणि संतोष मनोळे (२१ वर्षे, रा. संत मळा, इचलकरंजी) हे सावंतवाडी रेल्वे स्टेशन परिसरात बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आले.
गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपींना इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.कारवाई महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक, कोल्हापूर निकेश खाटमोडे-पाटील अप्पर पोलीस अधीक्षक, गड विभाग,समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, व पोलीस अंमलदार सागर चौगुले, प्रदीप पाटील, विशाल चौगुले, समीर कांबळे, सुशील पाटील.व गावभाग पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलीस अंमलदार अनिल पाटील, राम पाटील, अमित कदम, अमर कदम, बाजीराव पवार या संयुक्त पथकाने केली.या यशस्वी कामगिरीबद्दल कोल्हापूर पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800