प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रतीक्षा यादीतील घरकुले पूर्णत्वास जाणार-आ.राहुल आवाडेंच्या पाठपुराव्यास यश
इचलकरंजी –
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 साठी नव्याने उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, कोरोची तारदाळ आणि खोतवाडी या पाच गावातील प्रतिक्षा यादीतील 269 घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत. गोरगरीब सर्वसामान्य बेघरांचे स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न सत्यात यावे यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
सन 2024-25 या सालासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून हातकणंगले गटासाठी उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 5 गावांतील 269 घरकुलांचे उद्दीष्ट आहे. या पाच गावात एकूण 294 लाभार्थ्यांची नोंदणी असून त्यापैकी 269 घरकुलांचे उद्दीष्ट आले आहे. त्यामध्ये चंदूर 52, कबनूर 51, खोतवाडी 47, कोरोची 68 आणि तारदाळ 51 अशा घरकुल प्रस्तावांचा समावेश आहे.
मंजुरी देण्यापूर्वी प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांची निवड करताना खर्या अर्थाने गरजूंना लाभ मिळावा व एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार राहुल आवाडे यांनी केल्या आहेत. लाभार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संपूर्ण हातकणंगले तालुक्यासाठी 2583 घरकुलांचे आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात 269 घरकुलांचे उद्दीष्ट आहे. या सर्व लाभार्थ्यांचे त्या त्या ग्रामपंचायतीमार्फत पडताळणी करुन पात्र आणि अपात्र अशा लाभार्थ्यांची यादी ठरावाद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी होईल. येत्या दोन-तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800