राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गंगामाईच्या स्नेहा बसुदे व भक्ती ठोंबरे यांची निवड
इचलकरंजी : महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे मार्फत ज्युनिअर गटाच्या मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाच्या व्हॉलीबॉल संघात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडू कु. स्नेहा नागेश्वर बसुदे व भक्ती रावसाहेब ठोंबरे दोघी इ. 9 वी यांची निवड झालेली आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दोघी नुकत्याच वर्ध्याकडे रवाना झाल्या.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका श्री व्ही. एन. कांबळे, उपप्राचार्य श्री व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक श्री एस. एस. कोळी यांनी तिचे अभिनंदन केले.
श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन श्री कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदय लोखंडे, खजिनदार श्री महेशजी बांदवलकर, मानद सचिव श्री बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर, विश्वस्त श्री अहमद मुजावर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे दोन्ही खेळाडूंना बहुमोल सहकार्य लाभले.
या दोन्ही खेळाडूंना ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री शेखर शहा, क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे श्री शिवाजी पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800