गांजा सेवन करताना ८ जण पोलिसांनी घेतले ताब्यात – शहापूर पोलिसांची कारवाई.
शहापूर:
अंमली पदार्थांच्या गैरवापरावर कारवाई करत शहापूर पोलिसांनी आठ जणांना गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई तारदाळ गावच्या हद्दीत, प्राईड इंडिया टेक्सटाईल पार्कमधील वरद टेक्सटाईल कारखान्याच्या मागे शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोकळ्या जागेत गोलाकार बसून मातीच्या चिलीममधून गांजाचे सेवन करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये लक्ष्मण परशुराम बागडी (२२), रविंद्र परशुराम माळी (२७), अनुकुल माधव इनामदार (२५), रामेश्वर दत्ता लिंगायत (२९), सागर राजु वंजीरे (१९), अमर प्रमोद फातले (२०), रोशन मुरली साहू (२२) आणि स्वप्नील महावीर हलगुरे (२१) यांचा समावेश आहे. हे सर्व जण हातकणंगले तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क) सह २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रोहित डावळे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800